मनोगत

श्रीमती योगिनी जोगळेकर या मागच्या काही दशकातल्या प्रतिथयश आणि लोकप्रिय लेखिका होत्या शिवाय त्या नामवंत शास्त्रीय संगीत गायिका सुद्धा होत्या. १ नोव्हेंबर २००५ या दिवशी त्यांचे निधन झाले . त्यानंतर एका वर्षात, त्यांच्या कुटुंबीयांतर्फे त्यांच्या निवडक कथांचे २ कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात आले. या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात, कथासंग्रहांबरोबरच अक्षरयोगिनी हे मुद्राक्षर (font) सुद्धा प्रसिद्ध करून मोफत उपलब्ध करून देण्यात आला. अक्षरयोगिनी font हा अनेक जण वापरतात. पुस्तके लिहिणे, कागदपत्रांमध्ये वापराने किंवा इतर काही गोष्टीसाठी हा font बराच वापरला जातो.
२०२४ हे योगिनी जोगळेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने, त्यांचे सर्व साहित्य मुक्तपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमात उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयानी घेतला . त्यानुसार, या वर्षात सर्व साहित्य ईबुक, pdf प्रकारात उपलब्ध करून देण्यात येईल हे सर्व साहित्य, गाणी, भाषणे आणि छायाचित्रे इत्यादी yoginijoglekar.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे. CC BY-SA 4.0 या {परवानगी/परवाना} नुसार हे सर्व उपलब्ध करून देण्यात येत आहे
जर आपणास या साहित्यावरून नवे काही तयार करायचे आहे पण तुम्हाला हा परवाना योग्य वाटत नसेल तर तुम्हाला भारतीय प्रताधिकार कायद्यानुसार परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी किंवा इतर काही कामासाठी आपण सुधन्वा जोगळेकर यांना संपर्क करू शकता.
संपर्क
sudhanwa@sudhanwa.com sudhanwa.com@gmail.com